महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Swara Bhaskar's unique dance : कृषी कायदा मागे घेतल्यानंतर स्वरा भास्करचा अनोखा डान्स व्हायरल - Swara Bhaskar's dance style is special

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi) कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी आंदोलकांची समर्थक असलेल्या स्वरा भास्कर (Swara Bhaska)ने आनंद व्यक्त केलाय. तिने आपल्या अनख्या स्टाईलमघध्ये डान्स करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

स्वरा भास्करचा अनोखा डान्स व्हायरल
स्वरा भास्करचा अनोखा डान्स व्हायरल

By

Published : Nov 23, 2021, 5:30 PM IST

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaska)नेहमीच काही ना काही वक्तव्य करते ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा सुरू होतात. कधी तिच्या कमेंट्स व्हायरल होतात तर कधी व्हिडिओ, पण यावेळी स्वरा भास्करचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती मजेशीर पद्धतीने डान्स करताना दिसत आहे.

स्वरा भास्करची नृत्यशैलीही खास (Swara Bhaskar's dance style is special)आहे. व्हिडिओमध्ये स्वरा डोक्यावर काचेचा ग्लास घेऊन नाचत आहे जणू तिने खूप सराव केला आहे. व्हिडीओसोबत स्वरा भास्करने असेही सांगितले की, तिने ही कला आपल्या वडिलांकडून शिकली आहे.

स्वरा भास्करचा अनोखा डान्स व्हायरल

स्वरा भास्करने लिहिले, 'पार्टी ट्रिक: मी हे माझ्या वडिलांकडून शिकले. १९ नोव्हेंबर रोजी पीएम मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याचे (PM Modi withdraws agriculture law) बोलले आहे. व्हिडिओमध्ये स्वरा भास्कर डोक्यावर काचेचा ग्लास घेऊन मजेशीर पद्धतीने डान्स करत आहे. तिचा हा डान्स पाहून असे वाटते की ती अनेकदा पार्ट्यांमध्ये असाच डान्स करत असेल. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे काही चाहते स्वराचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे लोक ट्रोलही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मॅडम, जर हा ग्लास फुटला तर प्रॉब्लेम होईल.'

पीएम नरेंद्र मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याच्या चर्चेनंतर स्वराने आनंदात हा डान्स केला आहे. केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्यावर अनेक दिवसांपासून प्रचंड गदारोळ सुरू असून, जवळपास वर्षभरापासून देशातील विविध शहरांमध्ये शेतकरी या कायद्याविरोधात आवाज उठवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर काहींनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - 'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

ABOUT THE AUTHOR

...view details