महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आपच्या विजयानंतर स्वरा भास्कर म्हणाली.... - स्वरा भास्कर म्हणाली, 'दिल्ली मेरी जान'

स्वरा भास्करने दिल्लीमध्ये आप पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करीत तिने दिल्ली वासियांबद्दलचे प्रेम व्यक्त केलंय.

Swara Bhaskar
स्वरा भास्कर

By

Published : Feb 11, 2020, 8:31 PM IST


अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सामाजिक प्रश्नांवर ती नेहमी आपली मते व्यक्त करीत असते. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत आप पक्षालाला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्वराने आपल्या ट्विटरवर लिहिलंय, ''दिल्ली मेरी जान, फिर से प्यार हो गया तुम से.'' अशा प्रकारे दिल्लीच्या जनतेला तिने धन्यवाद दिलेस आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत झाली. यावेळी आम आदमी पार्टीला ७० पैकी तब्बल ६२ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी जनतेने केजरीवाल यांनाच पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा जनादेश दिलाय. यावेळी पुन्हा एखदा काँग्रेस पक्षाला आपले विधानसभेत खाते उघडता आले नाही.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details