मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीने डिजीटल विश्वाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मालिका आणि चित्रपटांमधून स्वप्नीलने आजवर दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता पहिल्यांदाच तो वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'समांतर' असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ हा आपला भविष्यकाळ ठरणार असल्याचे समजताच त्या व्यक्तीला शोधण्यासाठी निघालेल्या कुमार महाजनची ही कथा आहे. सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तीचा भूतकाळ हेच आपले भविष्य आहे, हे समजल्यानंतर आपले भविष्य आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी कुमारचे आयुष्य कसे बदलते, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.