महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

New Marathi Serial : स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर सोबत, ‘तू तेव्हा तशी' या नवीन मालिकेतून! - स्वप्नील जोशी शिल्पा तुळसकर मुख्य भूमिका

स्वप्नील हा लवकरच झी मराठी वाहिनीवर 'तू तेव्हा तशी' या दैनंदिन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी सोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहे.

tu tevha tashi
tu tevha tashi

By

Published : Feb 1, 2022, 3:17 PM IST

मुंबई - प्रेम या भावनेवर संपूर्ण मनोरंजनसृष्टी पोट भरत आलीये. प्रेम या विषयावर पूर्वापारपासून प्रत्येक चित्रपट, मालिका ई. मधून कथानकं चितारण्यात आली आहेत. प्रेम कुठल्याही वयात होऊ शकते आणि अशाच विषयावर आधारित एक नवीन मालिका आली आहे. महाराष्ट्राचा चॉकोलेट हिरो स्वप्नील जोशी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. मध्यमवयीन प्रेमकथेत त्याच्या सोबत असेल शिल्पा तुळसकर. 'तू तेव्हा तशी' म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहेत.

या मालिकेचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेनंतर झी मराठीवर स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल १० वर्षांनी एका दैनंदिन मालिकेत दिसणार आहे. 'तुला पाहते रे' मध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर शिल्पा तुळसकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

'तू तेव्हा तशी' मध्ये दिसणार फ्रेश जोडी
पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. जे कधीही विसरता येत नाही. आयुष्यभरासाठी त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर.....? प्रेम आणि प्रेमकथा म्हटलं की आपल्या समोर येतो तो मराठी मनोरंजन क्षेत्रामधील लोकप्रिय रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी. स्वप्नील हा लवकरच झी मराठी वाहिनीवर 'तू तेव्हा तशी' या दैनंदिन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी सोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहे.तू तेव्हा तशी या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.

मालिकेत पाहण्यास मिळणार यूथफूल प्रेमकहाणी

"यावर्षी मी मालिका करणार असं मी ठरवलं होतं. मालिकांनी आणि टीव्ही माध्यमाच्या रसिक प्रेक्षकांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा येताना मी उत्सुक आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ व अनामिकाची फ्रेश आणि ‘युथफूल’ प्रेमकहाणी म्हणजेच “तू तेव्हा तशी”. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, अशी ही मालिका आहे." असे स्वप्नीलने सांगितले. ’तू तेव्हा तशी’ ही गोष्ट आहे प्रेम व्यक्त करण्याचं राहून गेलेल्या सौरभ आणि अनामिकाची. सौरभला त्याचं प्रेम मिळणार की शेवटपर्यंत ‘प्रेम करायचं राहून गेलं’ हीच भावना सौरभसोबत राहणार. या प्रश्नच उत्तर प्रेक्षकांना लवकरच या मालिकेतून मिळेल."
हेही वाचा -Pinkicha Vijay Aso : ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत अधोक्षज कऱ्हाडे साकारतोय मस्तमौला तरुण

ABOUT THE AUTHOR

...view details