महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जिवलगा' मालिकेच्या टीमनं घेतलं पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन - jivlaga

“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे

स्वप्नील आणि सिद्धार्थनं घेतलं दर्शन

By

Published : Apr 21, 2019, 8:03 AM IST

मुंबई- अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. त्यांची येणारी आगामी मालिका ‘जिवलगा’ ही महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचावी, यासाठी या कलाकारांनी गणपतीला साकडे घातले.

बऱ्याच वर्षांनंतर स्वप्नील आणि सिद्धार्थ टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे ‘जिवलगा’ ही मालिका दोघांसाठीही अधिक खास आहे. मालिकेमध्ये या दोघांशिवाय आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील ‘जिवलगा’मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडेदेखील या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.


“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयासोबतच ग्लॅमरने ही मालिका सजली आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेल्या या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे, तर उमेश नामजोशी यांचे दिग्दर्शन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details