महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

स्वप्नील-अमृता छोट्या पडद्यावर येणार एकत्र; 'जिवलगा'चा प्रोमो प्रदर्शित - सिद्धार्थ चांदेकर

ही मालिका एक प्रेमकथा असून यामध्ये नात्यातले विविध पैलू उलगडताना दिसणार आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधुन या चारही कलाकारांच्या अभिनयाची दमदार झलक पाहायला मिळते.

स्वप्नील-अमृता छोट्या पडद्यावर येणार एकत्र

By

Published : Mar 21, 2019, 6:43 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील जोशी लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 'जिवलगा' या त्याच्या आगामी मालिकेत तो अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत झळकणार आहे. दमदार अभिनय आणि ग्लॅमरने सजलेल्या 'जिवलगा' मालिकेचा अलिकडेच प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत. ही मालिका एक प्रेमकथा असून यामध्ये नात्यातले विविध पैलू उलगडताना दिसणार आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधुन या चारही कलाकारांच्या अभिनयाची दमदार झलक पाहायला मिळते.

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या मालिकेची संकल्पना मांडली आहे. विद्याधर पठारे यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. तर, उमेश नामजोशी हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर ८ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details