मुंबई - ह्रतिक रोशन आणि सुझान खान हे नाव ग्लमरच्या जगात सुप्रसिद्ध आहे. तरीही सुझान अभिनयाकडे न वळता इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात उतरली. यामागचे कारण तिने उलगडले आहे. नेहा धुपियाच्या चाट शो मध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
एक अभिनेत्री बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सुझानकडे होत्या. सुंदर चेहरा, व्यक्तीमत्व, टॅलेंट, अभिनयाचा वारसा, इतके असुनही ती अभिनयाकडे वळली नाही. याचे कारण तिने सांगितले आहे. की 'माझी आई इंटेरिअर डिझायनर होती. तिच्यासोबत मी या कामाचा जवळून अनुभव घेतला. या करिअरने लहानपणीच माझ्यावर प्रभाव पाडला. तेव्हाच मी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला अभिनयाचे आकर्षण वाटले नाही.