मुंबई - सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) प्रसिद्ध वेब सिरिज 'आर्या'चा दुसरा सीझन रिलीज (second season release of the web series Arya) होणार आहे. अलीकडेच सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर आर्या-२ चा मोशन पोस्टर (Motion poster of 'Arya 2') व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता बंदूक घेऊन हेलिकॉप्टरमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी सुष्मिताने पांढरी साडी नेसली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आर्या-2चा ट्रेलर येत आहे. शेरणी येत आहे, सर्वांना सांगा आणि शेअर करा, Hotstar Specials Arya Season 2 चा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे."
दिग्दर्शक राम माधवानी यांनी 'आर्या 2' या वेब सिरीजमध्ये सुष्मिता सेनच्या पात्राच्या काही शेड्स तयार केल्या आहेत. या वेबसिरीजमधून दिग्दर्शक राम माधवानी यांचेही डिजिटल डेब्यू आहे. त्यांचा 'धमाका' हा एक चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
सुष्मिता सेनसोबत आर्यामध्ये चंद्रचूर सिंग, सिकंदर खेर, विकास कुमार, जयंत कृपलानी यांनी सहकलाकार म्हणून काम केले होते. पाच वर्षांनंतर सुष्मिता आर्यासोबत कमबॅक करत आहे. या शोमध्ये एक चांगली आई म्हणून सुष्मिताचा प्रवास आणि तिचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मोशन व्हिडीओ पाहून असे वाटते की सुष्मिता 'आर्या 2' मध्ये तिच्या पतीचा बदला घेणार आहे.