महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांत प्रकरण : शेखर सुमनला एखाद्या चमत्काराची प्रतीक्षा - Sushant Singh Rajput latest news

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाची चर्चा सध्या थांबली आहे. वर्तमानपत्रे आणि टीव्हीवरही या प्रकरणाची चर्चा थांबली आहे. त्यामुळे एखादा चमत्कारच या प्रकरणात घडू शकेल अशी आशा अभिनेता शेखर सुमन याला आहे.

Shekhar Suman
शेखर सुमन

By

Published : Dec 3, 2020, 7:00 PM IST

मुंबई - अभिनेता शेखर सुमनने सांगितले की, आता तो सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात काही चमत्काराची वाट पाहत आहे आणि आता जे काही बाकी आहे ते म्हणजे प्रार्थना.

शेखर सुमन यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलंय, "पुष्कळ लोक मला भेटतात, जे मला सुशांतच्या प्रकरणाबद्दल विचारतात. मलाही उत्तर मिळावे अशी माझी इच्छा आहे. आशा आणि प्रार्थना करण्याशिवाय जर एक दिवस या प्रकरणात एखादा चमत्कार होईल, या व्यतिरिक्त काहीही शिल्लक राहिलेले नाही.''

शेखर सुमन यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलंय...

हेही वाचा - अलिबागच्या समुद्रात दीपिका पदुकोणने सिध्दार्थ चतुर्वेदीसोबत घेतला सनसेटचा आनंद

काही दिवसांपूर्वी शेखर सुमनने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर सुशांत प्रकरणात पुरेसे कव्हरेज न दिल्याचा आरोप केला होता.

शेखर सुमनने म्हटले होते की, "वर्तमानपत्रांत अजिबात अपडेट होत नाही. टीव्ही वाहिनीवरूनही हे प्करण गायब झाले आहे. कोठेही चर्चा होत नाही."

हेही वाचा - हिना खानने मालदिवच्या सुट्टीत केली 'नाईट मोड' फोटोग्राफी

ABOUT THE AUTHOR

...view details