नवी दिल्ली- शहरातील १०,००० स्थलांतरित कामगारांना खायला देण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनीने पिपल्स फॉर द अॅथिकल्स ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल ( पेटा)सोबत हात मिळवणी केली आहे.
सनी म्हणाली, "आम्हाला संकटाचा सामना करावा लागत आहे, पण एकजूटपणे आणि सहानुभूतीने आपण पुढाकार घेऊ शकतो. मला पेटासोबत हात मिळवताना आनंद होत आहे. यावेळी हजारो गरजू लोकांना प्रोटीनयुक्त शाकाहारी जेवण पुरवण्यात येत आहे."
पेटाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये जेवणात डाळ आणि तांदूळ किंवा 'खिचडी' आणि बर्याचदा फळ असतात.
सनी लिओनीला २०१६ मध्ये पोटाच्या वतीने इंडियाज पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. पेटाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शाकाहारी फॅशन, शाकाहारी खाणे आणि कुत्रा आणि मांजरींना दत्तक घेणे आणि नसबंदीच्या समर्थनार्थ मोहीम चालवण्यात आली होती. त्याला सनीने समर्थन केले होते. पेटा आणि सनीलिओनी अदय फाऊंडेशनच्या वतीने अन्नदान करीत आहेत.
हेही वाचा - 'बाप माणूस' मालिकेतील अभिनेत्री अभिलाषा पाटीलचे कोरोनामुळे निधन