महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

साऊथच्या 'या' विलनसोबत सुनील शेट्टीची रंगणार जुगलबंदी, 'पेहलवान'चं पहिलं गाणं प्रदर्शित - किच्चा सुदीप

नुकताच त्याचा या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटातील पहिलं गाणं देखील प्रदर्शित झाले आहे.

साऊथच्या 'या' विलनसोबत सुनील शेट्टीची रंगणार जुगलबंदी, 'पेहलवान'चं पहिलं गाणं प्रदर्शित

By

Published : Jul 30, 2019, 7:34 PM IST

मुंबई -अभिनेता सुनील शेट्टीने आजवर बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा तो 'पेहलवान' या चित्रपटातून पडद्यावर झळकणार आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटातील पहिलं गाणं देखील प्रदर्शित झाले आहे.

'पेहलवान' हा बहुभाषिक चित्रपट आहे. तब्बल ५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक क्रिश्ना हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात त्याची साऊथचा सुपरस्टार विलन सुदीप याच्यासोबत जुगलबंदी रंगणार आहे. 'जय हो पेहलवान' हे पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात दोघांचीही जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळते.

'जय हो पेहलवान' हे गाणे तब्बल ५०० डान्सर्सला घेऊन तयार करण्यात आले आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याला कोरियोग्राफ केले आहे. व्यास राज, देव नागी आणि अमृता यांनी हे गाणे गायले आहे.

हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. २५०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details