इंदौर -मध्यप्रदेशच्या इंदौर येथे आयोजित संगीत समारभांत सुप्रसुद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर आणि संगीत दिग्दर्शक कुलदीप सिंग यांना 'लता मंगेशकर' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून स्थानिक बास्केटबॉल कॉम्लेक्समध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कुलदीप सिंग आणि सुमन कल्याणपूर यांचा 'लता मंगेशकर' पुरस्काराने सन्मान - मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये लता मंगेशकर पुरस्कार सोहळा
मध्य प्रदेश राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून स्थानिक बास्केटबॉल कॉम्लेक्समध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सांस्कृतिक मंत्री डॉ. साधौ यांनी दोन्ही कलाकारांना २ लाखांचा चेक, प्रमाणपत्र आणि शाल प्रदान करुन त्यांचा सन्मान केला. या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरचीही उपस्थिती होती.
विजयलक्ष्मी साधौ यांनी म्हटले, 'भारतरत्न पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे जन्म स्थळ हे इंदौर आहे. यामुळे येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे फार महत्व आहे. या कार्यक्रमामुळे राज्याच्या सांस्कृतिक कलेला नक्कीच चालना मिळेल'. त्यांनी सुमण कल्याणपूर आणि कुलदीप सिंग यांच्या प्रतिभेची प्रशंसाही केली.
TAGGED:
Lata Mangeshkar Award in Indore