मुंबई - लॉकडाऊनच्या काळात शाहरुखची मुलगी सुहाना सतत काहीना काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न करीत असते. यावेळी तिने आपल्या हातावर मेंदी काढली असून त्याचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सुहानाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आपल्या अदाने पोज देत आहे. तिच्या दोन्ही हातावर मेंदी रंगल्याचे फोटोत दिसत आहे.
सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक प्रतिक्रिया तिला मिळताना दिसतात.