मुंबई- छोट्या पडद्यावर अवघ्या काही काळातच लोकप्रिय झालेली मालिका 'तुला पाहते रे' आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. प्रेक्षकांचा निरोप घेताना या मालिकेत विक्रांतची भूमिका साकारलेल्या सुबोधने आपला एक फोटो शेअर करत प्रेक्षकांचे त्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आभार मानले आहेत.
'तुला पाहते रे': सुबोधने घेतला प्रेक्षकांचा निरोप, मानले आभार - gaythri datar
विक्रांत आणि ईशाच्या प्रेमकहाणीने सुरुवात झालेली ही मालिका अल्पाधीतच टीआरपीच्या यादीतही पहिल्या तीन स्थानकात पोहोचली होती. सुबोध भावे आणि गायत्री दातार हे यामध्ये मुख्य भूमिकेत होते. या दोघांचीही केमेस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
मालिका संपली. तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम आयुष्यभर आम्हाला ऊर्जा देत राहील. वाहिनी, आमचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वांमुळे ही मालिका झाली, तुमचे "तुला पाहते रे" संघाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद." विक्रांत" कडून खूप प्रेम. भेटूया लवकरच, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान विक्रांत आणि ईशाच्या प्रेमकहाणीने सुरुवात झालेली ही मालिका अल्पाधीतच टीआरपीच्या यादीतही पहिल्या तीन स्थानकात पोहोचली होती. सुबोध भावे आणि गायत्री दातार हे यामध्ये मुख्य भूमिकेत होते. या दोघांचीही केमेस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.