महाराष्ट्र

maharashtra

सुबोध भावे, भरत जाधव पहिल्यांदाच एकत्र, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

By

Published : Sep 10, 2019, 8:44 PM IST

या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर भरत जाधवला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सुबोध भावे, भरत जाधव पहिल्यांदाच एकत्र, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

मुंबई - मराठी सिनेसृष्टीत विनोदी कलाकारांच्या यादीत अभिनेता भरत जाधवचे नाव अग्रस्थानी आहे. तर, अभिनेता सुबोध भावेनेही एकापाठोपाठ एक दर्जेदार चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. आता या दोघांचीही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सुबोध भावेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं आहे.

'आप्पा आणि बाप्पा' असं या चित्रपटाचं नाव आहे. गरीमा धीर आणि जलज धीर यांनी चित्रपटाच्या निर्मात्यासह दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली आहे. तर अरविंद जगताप आणि अश्वनी धीर या चित्रपटाचे लेखक आहेत. अश्वनी धीर बॉलिवूडमधील 'सन ऑफ सरदार' आणि 'अतिथी तुम कब आओगे' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप समोर आली नाही.

हेही वाचा-पुजा सावंत दगडी चाळ-२ साठी सज्ज, शेअर केला फोटो

सुबोध आणि भरतची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाची आतुरता आहे. तर, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर भरत जाधवला पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता ही जोडी पडद्यावर काय धमाल करते हे पाहणे रंजक ठरेल.

हेही वाचा-आयुष्मान-भूमीच्या चाहत्यांची चंगळ, 'शुभमंगल ज्यादा सावधान'चा झाला मुहूर्त

ABOUT THE AUTHOR

...view details