‘इंडियन आयडल’ हा जगप्रसिद्ध सांगीतिक म्युझिक रियायलीटी शो (‘Indian Idol’ music reality show)आता मराठीमध्येसुद्धा (‘Indian Idol’ in Marathi)प्रसारित होतोय. हा कार्यक्रम अनाऊन्स झाल्यापासून त्याला भरपूर प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला असून त्यातून स्पर्धक गायकांना निवडताना परीक्षकांची तारांबळ उडाली. परंतु ते सर्व खुश आहेत कारण ‘इंडियन आयडल मराठी' (‘Indian Idol Marath)साठी उत्तम स्पर्धक मिळाले आहेत. थोडक्यात 'इंडियन आयडल मराठी' च्या ऑडिशनला मिळालेला (Great response to the audition)प्रतिसाद पाहता असे म्हणता येईल की इथे महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतील आवाज दुमदुमणार आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत.
संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय संगीतकार जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल (Musician duo Ajay-Atul)परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. मराठी आयडॉल आणि त्यातही अजय-अतुल हे परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. आयडलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. लेखक, कवी वैभव जोशी या शो साठी लिखाण करीत असून अजय अतुल यांना ‘वाजले की बारा’ फेम गायिका बेला शेंडे ऑडिशन्स मधून उत्तम स्पर्धक निवडण्यासाठी मदत करणार आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही.