महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या उपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा - vinod tawade

या कार्यक्रमात चित्रपट संकलक वामन भोसले यांना २०१९ च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी आणि अभिनेते भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या उपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा

By

Published : May 27, 2019, 8:11 AM IST

Updated : May 27, 2019, 8:47 AM IST

मुंबई -मुंबईतील वरळी येथील 'नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया' येथे ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने काल (२६ मे) पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली पहिल्यांदाच भारतात आले होते. त्यांच्यासोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यामध्ये यंदा उत्कृष्ट चित्रपटाचा मान 'भोंगा' चित्रपटाला मिळाला. तर, के. के. मेनन याला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेची निवड करण्यात आली.

चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना विनोद तावडे म्हणाले की, 'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर पुरस्कार) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती सर्व मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळे ऑस्करचे एक कार्यालय मुंबईतही असावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ऑस्कर अॅकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र, मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल'.

विनोद तावडे

या कार्यक्रमात चित्रपट संकलक वामन भोसले यांना २०१९ च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संकलक कॅरॉल लिटलटन यांच्या हस्ते हे विशेष पुरस्कार देण्यात आले. आपल्या कामाची नोंद घेऊन राज्य शासनाने आपल्याला पुरस्कार दिला याचा अत्यंत आनंद झाल्याचे सर्व पुरस्कारार्थींनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, संकलक कॅरॉल लिटलटन यांचा सांस्कृतिक मंत्र्यांकडून सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमात ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, संकलक कॅरॉल लिटलटन यांचा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्य मराठी चित्रपट सोहळ्यात आज देण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

सर्वोत्कृष्ट कथा - सुधाकर रेडी (नाळ)

सर्वोत्कृष्ट पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )

सर्वोत्कृष्ट संवाद - विवेक बेळे (आपला माणूस)

सर्वोत्कृष्ट गीत - संजय पाटील (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट संगीत - राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानाडे ( व्हॉट अप लग्न)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका -प्रियंका बर्वे (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक -उमेश जाधव ( मेनका उर्वशी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन ( एक संगायचाय अन्सेड हॉर्मनी )

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -मुक्ता बर्वे (बंदीशाला )

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- स्वानंद किरकिरे ( चुंबक )

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री-छाया क़दम ( न्यूड )

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख ( तेंडल्या)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-गौरी कोठवदे (पुष्पक विमान)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिति- शांताई मोशन पिक्चर्स ( बंदीशाला)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन -सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा

या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिसऱ्या क्रमांकावर तेंडल्या, दुसऱ्या क्रमांकावर बंदिशाला आणि पहिल्या क्रमांकावर 'भोंगा' चित्रपट ठरले असून, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून एक सांगायचंय - अन्सेड हार्मनी, आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट म्हणून भोंगाला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
राज्य शासनाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मात्र, गैरहजेरी होती. दिल्लीत असल्याकारणामुळे त्यांना या कार्यक्रमात उपस्थित राहता आले नाही. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रीकेत मात्र त्यांचे नाव होते.

Last Updated : May 27, 2019, 8:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details