यावर्षीच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात वाहिनीच्या कलाकारांच्या उत्साहात न्हाऊन निघालेली शोभायात्रा पाहायला मिळेल. मन सुखाने भरे तुडुंब, जेव्हा एकत्र येई कुटुंब, सण साजरे एकत्र करू, धम्माल मस्ती फेर धरू, कौतुक कर्तृत्वाचे करूया, नाते आपुलकीचे घट्ट जपूया, चला, परंपरा आपली राखूया, मराठी संस्कृती जपूया...असे म्हणत स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यातच प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी आहे. ती म्हणजे स्टार प्रवाह वरील मालिकांमधील सासू- सूनांच्या जोड्या गौरी-माई, दीपा- सौंदर्या, अरुंधती- अनघा, अबोली-रमा धमाकेदार गाण्यांवर थिरकणार आहेत.
धमाकेदार गाण्यांवर थिरकणार सासू- सूनांच्या जोड्या! - गाण्यांवर थिरकणार सासू- सूनांच्या जोड्या
यावर्षीच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात वाहिनीच्या कलाकारांच्या उत्साहात न्हाऊन निघालेली शोभायात्रा पाहायला मिळेल. हा कार्यक्रम रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा