महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मल्टिप्लेक्स, नाट्यगृहाच्या करमणूक शुल्क वाढीला स्थायी समितीचा विरोध, करवाढ तूर्तास टळली - Standing Committee opposes fee hike

मल्टीप्लेक्स बरोबरच सर्व प्रकारच्या सिनेमागृहांचे, नाटक जलसा आणि करमणुकीच्या इतर कार्यक्रमाचे तसेच, सर्कस, आनंद मेळा यांच्या शुल्कातही ५ ते ६ पट वाढ केली जाणार आहे. यासंबंधिचा प्रस्ताव शासनाने मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीकडे पाठवला होता. मात्र कोरोनाच्या काळात मनोरंजनाची ही ठिकाणे बंद होती. त्यामुळे हा प्रस्ताव लागू न करण्याचा निर्णय स्थायी समितीने प्रशासनाच्या करवाढ प्रस्तावाला विरोध दर्शवत प्रशासनाकडे परत पाठवला आहे. त्यामुळे करमणूक केंद्र आणि मल्टिप्लेक्सवरील करवाढ तूर्तास टळली आहे.

tax hike was immediate
करवाढ तूर्तास टळली

By

Published : Nov 12, 2020, 4:42 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना काळात नाट्यगृह, मल्टीप्लेक्स, करमणूक केंद्र बंद होती. आर्थिक संकटात सापडलेल्या या क्षेत्राना प्रत्येक शोच्या करात ६० रुपयांवरून एक हजार रुपये मोजणे, अडचणीचे ठरणार आहे. असे सांगत स्थायी समितीने प्रशासनाच्या करवाढ प्रस्तावाला विरोध दर्शवत प्रशासनाकडे परत पाठवला आहे. त्यामुळे करमणूक केंद्र आणि मल्टिप्लेक्सवरील करवाढ तूर्तास टळली आहे.

करवाढ तूर्तास टळली

प्रस्ताव परत पाठवला -

मुंबईत मल्टीप्लेक्सच्या प्रत्येक शोसाठी केवळ ६० रुपये आकारले जात आहेत. सिनेक्षेत्रात एकाच इमारतीत अनेक पडदे असतात. येथे एकाच वेळी सिनेमांचे अनेक शो चालतात. मल्टिप्लेक्सच्या कारभाराच्या तुलनेत ही रक्कम अंत्यत तुटपूंजी आहे. तर सिनेमागृहांमध्ये तिकीट हे २०० रुपयांपासून १५५० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी १ हजार रुपये करवाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. सध्या करवाढ न करता प्रस्ताव परत पाठवावा, अशी उपसूचना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत मांडली.

हेही वाचा - सानिया मिर्झाची नवी इनिंग, मालिकेतून करणार डिजीटल पदार्पण

सर्व पक्षांचा करवाढीला विरोध

विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी सूचनेला अनुमोदन तर सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदर प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवून दिला. यामुळे तूर्तास करमणूक करात होणारी वाढ टळली आहे. याबाबत सुधारित प्रस्ताव आल्यावर त्यावर विचार करून प्रशासनाने सुचवलेली दरवाढ लागू करायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिचा ट्रान्सपरंट उपाय

काय होता करवाढीचा प्रस्ताव -

सन २०१५ मध्ये पालिकेने मल्टीप्लेक्ससाठी स्वतंत्र श्रेणी तयार करून प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी ६६ रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. अद्याप राज्य शासनाने मंजूरी दिलेली नाही. मात्र, मल्टिप्लेक्सचा कारभार पाहता, ही करवाढ करणे आवश्यक आहे. त्यानुसार बंदिस्त जागेत अथवा खुल्या मैदानात होणार्‍या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत उत्सव, करमणुकीच्या आणि इतर कार्यक्रमांचा करही ३३ रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. मल्टीप्लेक्स बरोबरच सर्व प्रकारच्या सिनेमागृहांचे, नाटक जलसा आणि करमणुकीच्या इतर कार्यक्रमाचे तसेच, सर्कस, आनंद मेळा यांच्या शुल्कातही ५ ते ६ पट वाढ केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details