मुंबई - 'सर्कस' आणि 'फौजी' या मालिकांनंतर दूरदर्शनवर आता 'दुसरा केवल' ही मालिका प्रसारित होणार आहे. यात सुपरस्टार शाहरूख खान याची प्रमुख भूमिका आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीची ही मालिका आहे.
दूरदर्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे 'दुसरा केवल' पाहण्याची संधी यामुळे नव्या पिढीला मिळत आहे.
'दुसरा केवल' या मालिकेची कथा एका ग्रामीण भागातील तरुणाची आहे. केवल हा तरुण कामाच्या शोधात मोठ्या शहरात येतो आणि पुन्हा माघारी कधीच परतत नाही. त्याकाळी ही मालिका खूप लोकप्रिय ठरली होती आणि शाहरुखच्या लोकप्रियतेत यामुळे भर पडली होती. १९८९मध्ये ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. याचे काही मर्यादित एपिसोड आहेत.
लॉकडाऊननंतर दूरगृदर्शनवर 'रामायाण', 'महाभारत', 'श्रीमान श्रीमती', 'सर्कस', 'ब्योमकेश बख्शी' आणि 'फौजी' या मालिका प्रसारित होत आहेत. यात आता शाहरुखच्या या जुन्या मालिकेची भर पडली आहे.