मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच 'झिरो' चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्याने कोणत्या आगामी चित्रपटाची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची आतुरता आहे. सध्या शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शाहरुख कामासंबधी बोलताना दिसतोय.
शाहरुखला मिळेना काम, आता पाहतोय 'त्या' फोनची वाट! - बार्ड ऑफ ब्लड
शाहरुख सध्या चित्रपटांपासून जरी लांब असला, तरी तो सध्या नेटफ्लिक्सच्या २ प्रोजेक्टची निर्मिती त्याच्या रेड चिलीजअंतर्गत करत आहे.
नेटफ्लिक्सच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुखचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख कोणाशी तरी फोनवर काम मागताना दिसतो. मात्र, हे काम चित्रपटासाठी नाही, तर इंटेलिजंन्स एजन्सीसाठी असल्याचे त्याला कळते. त्याबद्दल तो आणखी विचारण्याचा प्रयत्न करतो, मात्र, तो फोन मध्येच बंद होतो. आता याबद्दल आणखी माहिती २२ ऑगस्टला मिळेल, असेही या व्हिडिओतून स्पष्ट होते.
शाहरुख सध्या चित्रपटांपासून जरी लांब असला, तरी तो सध्या नेटफ्लिक्सच्या २ प्रोजेक्टची निर्मिती त्याच्या रेड चिलीज अंतर्गत करत आहे. एक हॉरर वेबसीरिज 'बेतान' आणि इमरान हाश्मीची थ्रिलर 'बार्ड ऑफ ब्लड'ची निर्मिती त्याच्या प्रोडक्शन होममध्ये होत आहे. त्यामुळे पडद्यामागून शाहरुख चाहत्यांसाठी आणखी काहीतरी सरप्राईझ घेऊन येणार की काय, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.