मुंबई- नाथ संप्रदायाला श्रीदत्तगुरु महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे असं म्हंटलं जातं. श्री मच्छिन्द्रनाथांचे गुरु म्हणून श्रीदत्तगुरू महाराजांना यांना ओळखलं जातं. रंजक वळणावर मालिका येऊन ठेपलेली असतांना आता श्रीगुरुदत्तमहाराजांची व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेता मनोज कोल्हटकर साकारणार आहेत. मनोज कोल्हटकर यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केलंय. असे हे हरहुन्नरी नट आता 'गाथा नवनाथांची' या मालिकेत श्रीदत्तगुरू यांच्या भूमिकेत दिसताहेत.
मनोज यांनी बहुतांश नकारत्मक भूमिका साकारल्या असल्याने या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा त्यांना विचारणा झाली तेव्हा सकारात्मक, तेजस्वी भूमिका साकारायला मिळणार या विचाराने त्यांनी मालिकेत काम करण्यासाठी होकार दिला. मालिकेत श्रीदत्तगुरू महाराजांचं महत्त्व काय हे बघायला मिळत असून प्रेक्षकांना ते आवडेल यात शंका नाही. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना श्रीदत्तगुरू महाराज आणि नाथ संप्रदायाचा प्रवास अनुभवायला मिळतोय