बाडमेर - पश्चिम राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय लोकगीत कलाकारांनी कोरोनावर आधारित गाणे गायले आहे. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आत्तापर्यंत या गाण्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत.
बाड़मेरच्या विशाला गावात राहणारे आंतरराष्ट्रीय लोकगीत कलाकार फकिरा खान पद्मश्री अनवर खान बईया यांनी हे गाणे तयार केले आहे.
आंतरराष्ट्रीय लोकगीत कलाकारांनी तयार केले कोरोनावर आधारित गाणे
बाड़मेरच्या विशाला गावात राहणारे आंतरराष्ट्रीय लोकगीत कलाकार फकिरा खान पद्मश्री अनवर खान बईया यांनी हे गाणे तयार केले आहे.
या गाण्याबाबत त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. जगभरात कोरोना विषाणूमुळे असंख्य नागरिकांचा बळी गेला आहे. या महामारीचा कोणताही उपचार नाही. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करा. तसेच, योग्य ती खबरदारी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या सर्वांना या कठीण परिस्थितीचा धाडसाने सामना करायचा आहे. त्यामुळे याबाबत अधिक जागरुक राहून काम करायला हवे, असेही ते म्हणाले.
आपल्या देशात संगीताचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे गाण्याच्या मार्फत लोकांना संदेश देणे सोपे ठरते. त्यामुळे हे गाणे तयार करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगीतले.