स्वातंत्र्यदिन जवळ आला की सर्व माहोल ‘तिरंगी’ होऊन जातो. जवळपास प्रत्येक मालिकेमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा होताना दिसतो. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतसुद्धा या खास दिनी खास घटना घडताना दिसणार आहे. मालिकेचा स्वातंत्र्य दिन विशेष भाग १५ ऑगस्ट रोजी प्रसारित होणार आहे.
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये घर आणि कामातील जबाबदार्या संजू उत्तमरीत्या पार पाडते आहे. संजूने प्राण पणाला लावून रणजीतची सुटका केली. आता रणजीतच्या साथीने ती अपर्णाचं सत्य देखील घरच्यांच्या समोर आणणार आहे. त्यासाठी रणजीतसोबत ती नवी खेळी देखील रचते आहे. याचसोबत डॉक्टर तोडकरच्या दवाखान्याचा पर्दाफाश कसा करता येईल यासाठी रणजीत तिला योग्य ते मार्गदर्शन करतो आहे. रणजीतला झालेल्या अटक प्रकरणात संजू पूर्ण मुळाशी गेली आणि बनावटी औषधा प्रकरणी खर्या गुन्हेगाराला अटक केली. याबाबत तिचा सत्कार होणार आहे.