महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बेयर ग्रीलसोबत 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मध्ये दिसणार रजनीकांत - Rajinikanth latest news

रजनीकांत यांनी या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी दोन दिवस त्यांच्या इतर कामातून ब्रेक घेतला आहे. म्हैसूरच्या काही भागातही त्यांच्यासोबत शूटिंग केले जाणार आहे.

South Superstar Rajinikanth will be Appearing in Man Vs Wild Show
बेयर ग्रीलसोबत 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मध्ये दिसणार रजनीकांत

By

Published : Jan 28, 2020, 1:35 PM IST

मुंबई -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे लवकरच बियर ग्रीलच्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यंदा थलायवाचीही बेयर ग्रीलसोबत जंगलभ्रमंती पाहायला मिळणार आहे.

बेयर ग्रील

रजनीकांत हे बियर ग्रीलसोबत कर्नाटकमधील बंदीपूरच्या व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. याठिकाणी ते ६ तास शूटिंग करणार आहेत. २७ जानेवारीला त्यांच्यासोबतच्या पहिल्या दिवसाचे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या भागाचं उर्वरीत चित्रीकरण हे २८ जानेवारीला पूर्ण करण्यात येणार आहे.

रजनीकांत यांनी या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी दोन दिवस त्यांच्या इतर कामातून ब्रेक घेतला आहे. म्हैसूरच्या काही भागातही त्यांच्यासोबत शूटिंग केले जाणार आहे. त्यामुळे 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मध्ये रजनीकांत यांना पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details