मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान दोघेही आगामी चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, दोन सुपरस्टार एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांनाही त्यांच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे.
Confirmed: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि आमिर खान येणार एकत्र - अमिताभ बच्चन
विजय सेतुपतीला अलिकडेच मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल अवार्ड्स सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
विजय सेतुपती सध्या त्याच्या आगामी 'सांगा थमिजान' (sanga thamizhan) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आमिरने त्याच्या चित्रपटाच्या सेटवर जाऊन त्याची भेट घेतली होती. तेव्हापासूनच दोघेही एकत्र भूमिका साकारतील, अशी चिन्ह दिसू लागली होती. आता दोघेही एकत्र भूमिका साकारतील या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला आहे.
विजय सेतुपतीला अलिकडेच मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल अवार्ड्स सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
एका माध्यमाशी बोलताना त्याने आमिरसोबत काम करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचाही चाहता असल्याचे त्याने सांगितले. मेलबर्न येथे त्याने शाहरुखची भेटही घेतली.