महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सौजन्या आत्महत्या प्रकरण : असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण शोधताहेत पोलीस - सौजन्याच्या आत्महत्येचे कारण

कन्नड अभिनेत्री सौजन्या हिने बंगळूरू येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी खोलीमध्ये तिने लिहिलेले चार पानी सुसाईड नोटही सापडली होती. यात तिने दावा केला होता की मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे आत्महत्या करीत आहे. पोलीस तिच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. कथित आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.

सौजन्या आत्महत्या प्रकरण
सौजन्या आत्महत्या प्रकरण

By

Published : Oct 1, 2021, 4:23 PM IST

बेंगळुरू- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सौजन्या रामनगर जिल्ह्यातील बेंगळुरू शहराच्या बाहेरील डोड्डाबेले गावाजवळ एका अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली होती. तिने आत्महत्या केल्या प्राथमिक कारण वाटत होते. तिने आपल्या खोलीस सुसाईड नोट ठेवली होती.

कथित आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सौजन्याने चार पानांची सुसाईट नोट लिहून ठेवली होती. यात तिने दावा केला होता की मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे आत्महत्या करीत आहे. पोलीस तिच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. कथित आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.

सुसाईड नोटमध्ये सौजन्याने मागितली आई वडिलांची माफी

तिच्या मृत्यूच्या चिठ्ठीत असे लिहिले आहे: "हे केल्याबद्दल मी खरोखर दिलगीर आहे. पप्पा मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी तुमच्याशी बोलल्या प्रमाणे सक्षम नाही. हे कठीण आहे 'अप्पा' (वडील). आई मला माफ कर, मी आज येईन म्हणाले होते, या पध्दतीने यावे गालेल हे मला माहिती नव्हते. त्यामुळे माफ करा मा. मला याबद्दल खूप खेद आहे. पप्पा, कृपया तुम्हाला आईची काळजी घ्यावी लागेल."

"मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते. या मागे माझी मानसिक स्थिती चांगली नाही. आरोग्याचा प्रश्न मला आतून मारत आहे. त्यामुळे मला हे करणे योग्य वाटले. मला खूप वाईट वाटते. आता तरी मला हे करायला आवडत नाही. पण, पप्पा, आई , मला माफ करा, मी तुमच्यावर प्रत्येक गोष्टीसाठी प्रेम करते. "

आत्महत्येचे कारण शोधताहेत पोलीस

रामनगरचे एसपी गिरीश यांनी सांगितले की, ''सकाळी 11 च्या सुमारास कथित आत्महत्येबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन मृत्यूची चिठ्ठी जप्त केली.''

सौजन्या दीड वर्षापासून अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सुचवण्यात आले आहे, परंतु शवविच्छेदन अहवाल पूर्ण झाल्यानंतरच हे स्पष्ट होऊ शकते.

हेही वाचा - ‘केबीसी’मध्ये बिग बी सांगताहेत त्यांच्या आयुष्यातील ‘आनंद’ इफेक्ट!

ABOUT THE AUTHOR

...view details