महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शिर्डीत आलेल्या सोनू सूदने मुंबईतील बेकायदेशीर बांधकामाबद्दल धरले मौन - अभिनेता सोनू सूद

अभिनेता सोनू सूदने शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्याने मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी बोलण्याचे टाळले. साईबाबांच्या दर्शनाने शांती मिळाली असल्याचे तो म्हणाला.

Actor Sonu Sood
अभिनेता सोनू सूद

By

Published : Jan 8, 2021, 6:14 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - अभिनेता सोनू सूद याने आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधिचे दर्शन घेत दुपारच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली आहे. त्यानंतर माध्यमांशी त्याने वार्तालाप केला. मुंबई महानगर पालिकेने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी सोनू सूद यांना बजावलेल्या नोटीस वर बोलतांना तो म्हणाला की, मी साईबाबांचे दर्शनासाठी आलो असून त्या सर्व किरकोळ गोष्टी आहेत. याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे म्हणत त्याने या प्रकरणावर बोलणे टाळले.

अभिनेता सोनू सूदने शिर्डीत

आज खूप दिवसांनी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलो असून साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला शांती मिळाली असल्याचं यावेळी सोनू सूदने सांगितले. आज सोनू सूद अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील काही गोरगरीब मुलांना मोफत मोबाईल वाटप करणार आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण मोबाईलवरुन दिले जात असून अनेक गरिबांकडे असे फोन नाहीत. त्या मुलांसाठी सोनूने फोन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा - केजीएफ स्टार यशने कोरोनामुळे रद्द केले बर्थ डे सेलेब्रिशन

ABOUT THE AUTHOR

...view details