मुंबईः कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान अभिनेता सोनू सूद याने प्रवासी कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यास मदत केली होती. तो आता हा अनुभव सांगणारे एक पुस्तक लिहिणार आहे.
"मागील साडेतीन महिने दिवसातील १६ ते १८ तास स्थलांतरितांसोबत राहून त्यांचे दुःख वाटून घेताना माझ्यासाठी एक प्रकारचा जीवन बदलणारा अनुभव आहे. जेव्हा मी घरी परत जायला निघालो तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. माझे हृदय आनंद आणि समाधानाने भरले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून, त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू माझ्या आयुष्यातील सर्वात खास अनुभव ठरला आणि मी त्यांना वचन दिले की शेवटचा व्यक्ती घरी पोहोचेपर्यंत मी त्यांच्यासाठी काम करीत राहीन.", असे सोनूने जाहीर केले आहे.
"माझा विश्वास आहे की मी याच कार्यासाठी या शहरात आलो आहे. मला परप्रांतीयांना मदत करण्यासाठी उत्प्रेरक बनविण्याबद्दल मी देवाचे आभार मानू इच्छितो. मुंबईत माझे हृदय धडकत असले तरी, या मोहिमेनंतर मला असे वाचते की मी यूपी, बिहार, झारखंड, आसाम, उत्तराखंड आणि इतर अनेक राज्यातील खेड्यांचा रहिवासी आहे. तिथे मला अनेक नवीन मित्र सापडले आहेत आणि त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. माझ्या जीवनातील या अनुभवाच्या गोष्टी कायमस्वरुपी पुस्कात लिहिण्याचा निर्णय घेतला आहे," असे तो म्हणाला. हे पुस्तक पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रकाशित करणार आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये मृत आणि जखमी झालेल्या 400 मजूर कुटुंबांना मदत करणार सोनू सूद
भारताच्या विविध भागात शेकडो स्थलांतरितांना मदत करण्याबरोबरच सोनू सूद यांनी पंजाबमधील डॉक्टरांना पीपीई किट आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्या आहेत.