मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूददेखील 'कॅन्सल बोर्ड परीक्षा' या याचिकेच्या मोहीमेत सामील झाला असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंतर्गत मूल्यांकन पद्धती असावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोनूने विद्यार्थ्यांना आवाहन केले. व्हिडिओमध्ये सोनू असे म्हणतो आहे, की कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेसाठी तयार नाहीत.
व्हिडिओमध्ये सोनू सूद म्हणतो, "विद्यार्थ्यांच्या वतीने मला एक विनंती करायची आहे. सीबीएसई आणि बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत, मला वाटत नाही, की या परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा देण्यास तयार आहेत.''
अभिनेता सोनू म्हणाला, "तरीही, आम्ही परीक्षा आयोजित करण्याबद्दल विचार करीत आहोत, जे अन्यायकारक आहे. मला वाटत नाही, की ऑफलाइन परीक्षांसाठी ही योग्य वेळ आहे. सर्वांनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांचे समर्थन करावे अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील."