महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

VIRAL VIDEO: सोनू निगमच्या मुलाने लाजून गायले त्याच्या वडिलाचेच गाणे - सोनू निगमच्या मुलाने लाजून गायले त्याचा वडिलाचेच गाणे

सोनू निगमचा मुलगा निवान याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो वडील सोनू निगमने गायलेले प्रसिद्ध गीत 'अभी मुझे में कहीन' गाताना दिसतोय. हा आवाज ऐकून चाहते चकित झाले आहेत.

सोनू निगमचा मुलगा निवान
सोनू निगमचा मुलगा निवान

By

Published : Sep 22, 2021, 8:58 PM IST

Updated : Sep 22, 2021, 10:35 PM IST

मुंबई- सोनू निगम एक उत्तम गायक आहे, ही गोष्ट साऱ्या जगाला माहिती आहे. परंतु त्याचा मुलगाही उत्तम गायक होण्याच्या मार्गावर आहे हे कदाचीत काहींना माहिती नसेल. जितकी प्रतिभा सोनूमध्ये आहे तशीच ती त्याचा मुलगा निवान याच्यामध्येही उतरली आहे. अलिकडेच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

सोनूचा मुलगा निवान याने वडिलाचेच गाणे गायले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्याच्या गाण्याचा हा व्हिडिओ indiastalents नावाच्या पेजने शेअर केला आहे. सोनू एका पुरस्कार सोहळ्यात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने आपला मुलगा निवान याला हातात धरले आहे आणि तो त्याआपल्या वडिलांचे प्रसिद्ध गीत 'अभी मुझे में कहीन' गाताना दिसत आहे. ज्या निरागसतेने लहान निवान निगम हे गाणे गात आहे त्यामुळे त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. व्हिडिओवर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. वडील आणि मुलाच्या या जोडीवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

हा व्हिडिओ पाहून निवानचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. हा मुलगा प्रसिध्द झाला पाहिजे अशा अपेक्षा लोक व्यक्त करीत आहे. 'मुलगा त्याच्या वडिलांसारखाच प्रतिभावान आहे', अशा प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत. एकूणच लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सोनू निगम बॉलिवूडचा एक प्रसिद्ध गायक आहे, ज्याने अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

हेही वाचा - शहनाझची आर्त स्वरात सिध्दार्थला हाक, गायले भावूक गाणे

Last Updated : Sep 22, 2021, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details