जेव्हापासून 'वेल डन बेबी' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याची घोषणा झाल्यापासून तो भरपूर चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाल्यावर तो कधी नव्हे इतक्या प्रचंड प्रमाणात पाहिला गेला. चित्रपटाचा ‘लूक’ अतिशय फ्रेश असून आधुनिक एकल कुटुंबातील उद्भवणाऱ्या समस्यांना नाजूकपणे हाताळण्यात दिग्दर्शिका प्रियांका तन्वर यशस्वी झाल्यागत वाटते. खासकरून तिने चित्रपटातील गाण्याच्या चित्रणात फारच हळूरवरपण जाणवते. नुकताच या चित्रपटातील गाण्यांचा अल्बम अनावरीत केला गेला आणि या कौटुंबिक चित्रपटाचा म्युझिक अल्बम रसिकांचे मन जिंकतो आहे. या साऊंड ट्रॅकमधील ‘आई-बाबा’ हे गाणं अतिशय सुंदर बनले असून ते जगात प्रेम आणि नवीन आयुष्य साजरे करते.
'वेल डन बेबी’ चित्रपटातील ‘आई बाबा’ गाणे रिलीज! - ‘वेल डन बेबी’मध्ये पुष्कर जोग
'वेल डन बेबी' या आगामी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. ‘आई बाबा’ हे गाणे संगीतकार द्वयी रोहन-रोहन पैकी रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. या गाण्याचे चित्रीकरण अतिशय सुंदर झाले आहे.
'वेल डन बेबी’