महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सोनचिडियां' की 'लुकाछुपी', बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी? - kriti senon

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि भूमी पेडणेकर यांचा 'सोनचिडियां' हा चित्रपट उद्या म्हणजेच १ मार्चला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शर्यतीत कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांचा 'लुकाछुपी' हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. दोन्हीही चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्हीही चित्रपटांमध्ये शर्थीची चुरस रंगताना दिसणार आहे.

बॉक्स ऑफिस

By

Published : Feb 28, 2019, 11:54 PM IST

मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि भूमी पेडणेकर यांचा 'सोनचिडियां' हा चित्रपट उद्या म्हणजेच १ मार्चला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शर्यतीत कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांचा 'लुकाछुपी' हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. दोन्हीही चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्हीही चित्रपटांमध्ये शर्थीची चुरस रंगताना दिसणार आहे.

'सोनचिडियां' चित्रपटात भरपूर स्टंट्स आणि अॅक्शनचा थरार पाहायला मिळणार आहे. सुशांत, मनोज बाजपेयी, भूमी पेडणेकर, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा यांच्या या चित्रपटाच प्रमुख भूमिका आहेत. सुशांत सिंग राजपूत यामध्ये दरोडेखोराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. तर, निर्मिती रॉनी स्क्रुवाला यांची आहे.

दुसरीकडे कार्तिक आर्यन आणि कृती सेनन यांची जोडी पहिल्यांदाच 'लुकाछुपी' या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या जोडप्याची मनोरंजक कथा दाखविण्यात येणार आहे. भारतात २१०० तर विदेशात ४०७अशा तब्बल २५०७ स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

आता दोन्ही चित्रपटांच्या या शर्यतीत कोणता चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details