मुंबई -अभिनेता अनिल कपूर आणि सुनिता यांच्या लग्नाला मंगळवारी ३६ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने त्यांची मुलगी सोनम कपूरने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर आई वडिलांचा एक फोटो शेअर करीत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तिने लिहिलंय, ''हॅप्पी अॅनिव्हर्सरी पेरेंट्स...मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुमची आठवणही काढते. ३६ वर्ष विवाहाचे आणि ११ वर्ष डेटिंगचे..!!! तुमची प्रेमकहाणी सर्वात सुंदर, प्रेमळ हास्याने आमचे कुटुंब हासरे होत असते. कारण नाराजी फक्त सिनेमात असते, खऱ्या जीवनात नाही. तुम्ही तीन विश्वासू आणि खट्याळ मुलेही जन्माला घातलीत. आम्हाला खात्री आहे, की तुम्हाला आमच्याबद्दल अभिमान वाटेल.''