महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनम कपूर बनली 'लकी फॅक्टर', 'द झोया फॅक्टर'चा ट्रेलर प्रदर्शित - अंगद बेदी

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता दुलकर सलमान हा देखील झळकणार आहे. तसेच, अंगद बेदी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

सोनम कपूर बनली 'लकी फॅक्टर', 'द झोया फॅक्टर'चा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Aug 29, 2019, 3:27 PM IST

मुंबई -अभिनेत्री सोनम कपूर 'द झोया फॅक्टर' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती 'लकी चार्म' म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'द झोया फॅक्टर'च्या ट्रेलरमध्ये सोनम कपूर ही 'झोया'ची भूमिका साकारत आहे. झोया ही सर्वांसाठी लकी चार्म ठरत असल्याचे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट टीमसाठी ती लकी असल्याचं यामध्ये दाखवण्यात आलं आहे. यावरुन इतकं तर नक्की, की हा सिनेमा एक वेगळा आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता दुलकर सलमान हा देखील झळकणार आहे. तसेच, अंगद बेदी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केलं आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details