मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये ती रुपा देवी यांच्या मदतीसाठी आली होती. यावेळी अमिताभ यांनी एक रामायणातील प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर माहिती नसणे समजू शकते. परंतु जे उत्तर सोनाक्षीने दिले त्याची टींगल सुरू झाली आहे.
सोनाक्षीचे उत्तर ऐकून नेटकरी म्हणताहेत..."हे राम!" - KBC latest news
सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर भरपूर ट्रोल होत आहे. केबीसीमध्ये विचारलेल्या प्रश्नावर ती ज्या पर्यायाचा विचार करत होती यावरुन नेटकरी तिची खिल्ली उडवीत आहेत.
रामायणानुसार हनुमानाने कोणासाठी संजीवनी बुटी आणली होती. असा केबीसीतला प्रश्न होता. याला सुग्रीव, लक्ष्मण, राम आणि सिता असे चार पर्यायही दिले होते. मात्र सोनाक्षी मॅडम सिता या पर्यायाचा विचार करु लागल्या. या उत्तरामुळे रुपा देवी फसू नयेत म्हणून लाईफ लाईन घेण्याचा सल्ला अमिताभ बच्चन यांनी दिला. अखेर एक्सपर्टच्या मदतीने हे उत्तर देण्यात आले. याच कारणामुळे सध्या सोनाक्षीला ट्रोल केले जात आहे.
खरंतर अखंड रामायणातील सर्व पात्रे सोनाक्षीच्या घरातच आहे. कारण तिच्या काकांची नावे आहेत राम, लक्ष्मण, भरत. वडिलांचे नाव आहे शत्रुघ्न आणि तिच्या भावांची नावे आहेत लव आणि कुश. तिच्या या अज्ञानावर नेटकऱ्यांनी तिची भरपूर खिल्ली उडवली आहे.