महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमान खान सतत मारतो टोमणे, सोनाक्षी सिन्हाचा खुलासा - The Kapil Sharma Show

सलमान खानने सोनाक्षी सिन्हाला डिनरसाठी आमंत्रण देण्याची विनंती केली होती. मात्र सोनाक्षी आमंत्रण देऊ शकली नाही. यावरुन आजही सलमान तिला सतत टोमणे मारत असल्याचा खुलासा सोनाक्षीने केला आहे. ती द कपील शर्मा शोमध्ये 'खानदानी शफाखाना' च्या प्रमोशनसाठी आली होती.

सोनाक्षी सिन्हा

By

Published : Aug 3, 2019, 5:22 PM IST


मुंबई - सोनाक्षी सिन्हा आणि रॅपर बादशाह अलिकडे द कपील शर्मा शोमध्ये 'खानदानी शफाखाना' च्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळी कपीलसोबत त्यांनी भरपूर दंगामस्त केली आणि काही रहस्यांचाही उलगडा केला.

सलमान खानने सोनाक्षी सिन्हाला डिनरसाठी आमंत्रण देण्याची विनंती केली होती. मात्र सोनाक्षी आमंत्रण देऊ शकली नाही. यावरुन आजही सलमान तिला सतत टोमणे मारत असल्याचा मजेशीर खुलासा तिने यावेळी बोलताना केला.

सोनाक्षी सिन्हाची पहिली कमाई ३००० रुपयांची होती. यासाठी तिला चेक मिळाला होता. तो चेक आठवण म्हणून तिच्या आईने फ्रेम करुन ठेवला आहे. याबद्दलचा किस्सा तिने सांगितला.

सोनाक्षी लॅक्मे फॅशन शोच्या इव्हेन्टमध्ये कामासाठी गेली होती. आलेल्या निमंत्रितांना त्यांच्या सीटवर बसवण्याचे काम तिच्याकडे होते. यावेळी सलमान खान इव्हेन्टला आला होता. सोनाक्षीने त्याला बसवले. त्यावेळी सलमान म्हणाली की तू इथे कशी, याचे तुला पैसे मिळणार आहेत का ? सोनाक्षीने होय असे उत्तर दिले. मग सलमानने या कमाईतून आपल्याला डिनर दे अशी मागणी केली. ती कमाई होती ३००० रुपये. इतक्या पैशातून सलमानला डिनर कसा देता येईल असा विचार करुन तिने डिनर टाळला. मात्र आजही सलमान यावरुन टोमणे मारत असल्याचे सोनाक्षीने सांगितले.

यावेळी सलमानने सोनाक्षीला वजन कमी करण्याचाही सल्ला दिला. वजन कमी केल्यानंतर सिनेमात संधी देण्याचे आश्वासनही त्याने दिले होते. हे आश्वासन त्याने पाळले आणि सोनाक्षी 'दबंग गर्ल' म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखली जाऊ लागली.

'खानदानी शफाखाना' चित्रपट २ ऑगस्टला रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई झालेली नसल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवशीची कमाई १ कोटी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details