मुंबई -बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ती डिजीटल विश्वात पदार्पण करणार आहे. अॅमॅझॉन प्राईमवर गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाक्षीने ही माहिती दिली आहे.
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गुलशन देवेय्या, सोहुम शाह आणि विजय शर्मा यांसारखे कलाकार सोनाक्षीसोबत भूमिका साकारणार आहेत. रीमा कागदी या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहे.
हेही वाचा -करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटाची पहिली झलक, प्रदर्शनाची तारीख ठरली