महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठीमध्ये टास्क करीत स्नेहा वाघचा वाढदिवस झाला साजरा! - बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सेलिब्रिशेनचा मूड

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सेलिब्रिशेनचा मूड होता. घरातील सदस्य स्नेहा वाघचा वाढदिवस सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन साजरा केला. तृप्ती देसाई यांनी सगळ्यांच्यावतीने तिला छानसं गिफ्ट देखील दिलं.

स्नेहा वाघचा वाढदिवस
स्नेहा वाघचा वाढदिवस

By

Published : Oct 7, 2021, 10:22 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नवीन थीम असणार आहे “टेलिफोन”. जेव्हा जेव्हा या टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हनांना सामोरं जावं लागणार आहे असे बिग बॉस यांनी घोषित केले. अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादुस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. आता नवीन टास्क आहे “माझे मडके भरी”. घरातील भाड्यांची सुविधा जिंकण्यासाठी हे कार्य सोपवण्यात आले आहे.

तृप्ती देसाई यांनी सगळ्यांच्यावतीने तिला छानसं गिफ्ट देखील दिलं

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सेलिब्रिशेनचा मूड होता. घरातील सदस्य स्नेहा वाघचा वाढदिवस सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन साजरा केला. तृप्ती देसाई यांनी सगळ्यांच्यावतीने तिला छानसं गिफ्ट देखील दिलं. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सणासुदीच्या दिवशी, कोणाचा वाढदिवस असेल तर गोडधोड पदार्थ खाण्याची संधी सदस्यांना मिळते आणि त्याचा आनंद या सदस्यांच्या चेहर्‍यावर दिसून येतो.

बिग बॉस मराठीच्या घरामधील टास्क

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लिहिली पोस्ट : देव कणखर व्यक्तींची परीक्षा घेत असतो

ABOUT THE AUTHOR

...view details