महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

स्नेहा वाघने दुसऱ्या नवऱ्यावर केला शोषणाचा आरोप, भडकली काम्या पंजाबी

'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणारी अभिनेत्री स्नेहा वाघने अलीकडच्या एपिसोडमध्ये दोन अयशस्वी लग्नांविषयी सांगितले. तिने पहिल्या पतीवर शारीरिक शोषण केल्याचा आणि दुसऱ्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. यानंतर तिचा दुसरा पती अनुराग सोलंकी आणि त्याची मैत्रीण काम्या पंजाबी यांनी स्नेहावर टीका केली आहे.

स्नेहा वाघवर रागवली काम्या पंजाबी
स्नेहा वाघवर रागवली काम्या पंजाबी

By

Published : Sep 22, 2021, 5:03 PM IST

मुंबई - अलीकडेच टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघने तिच्या दोन लग्नांबद्दल बिग बॉस मराठीमध्ये जे भाष्य केले त्यावर काम्या पंजाबी भडकली आहे. स्नेहा वाघ सध्या 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या शोमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. शोच्या अलीकडील भागात स्नेहा वाघ तिच्या दोन अयशस्वी विवाह आणि पतीपासून विभक्त होण्याविषयी बोलताना दिसली. स्नेहा वाघने दावा केला की पहिल्या पतीने तिचे शारीरिक शोषण केले, तर दुसऱ्या पतीने तिच्यावर अत्याचार केला.

काम्या पंजाबी स्नेहावर नाराज

हे ऐकल्यावर काम्या पंजाबी भडकली, तिने स्नेहा वाघला सोशल मीडियावर धारेवर धरले आहे. काम्या पंजाबीने ट्विटरवर स्नेहा वाघला टॅग करत लिहिले, 'तुला बिग बॉसमध्ये जायचे होते आणि तू गेलीस. पण तू व्हिक्टिम कार्ड का खेळत आहेस? तुमच्या पहिल्या लग्नाबद्दल मला काहीही माहीत नाही, परंतु जर तू फक्त खेळासाठी दुसऱ्या लग्नाबद्दलच्या अशा गोष्टी तयार करत असशील तर खबरदार. तुला चांगले माहित आहे की मी संपूर्ण सत्य बाहेर आणू शकते, शुभेच्छा. घाणेरडे खेळ खेळू नको स्नेहा. '

हेही वाचा - खतरों के खिलाडी 11: अर्जुन बिजलानी ठरला विजेता, आता ग्रँड फिनालेच्या टेलिकास्टची प्रतीक्षा

काम्या पंजाबी अनुराग सोलंकीला चांगल्या प्रकारे ओळखते. त्यांच्यात कुटुंबाप्रमाणे नाते आहे. त्यामुळे नेहाने असे विधान केल्यानंतर काम्या भडकली. अनुराग सोलंकीदेखील काम्याकडून पाठिंबा मिळाल्याबद्दल आनंदी आहे. त्याने ट्विटरवर काम्याचे आभार मानले आणि त्याने स्नेहा वाघवर रागही काढला. म्हणाला की त्याला आश्चर्य वाटते की कोणी एका शोसाठी इतक्या खालच्या थराला कसे काय जाऊ शकते?

अनुराग सोलंकीने दिले स्नेहा वाघला आव्हान

अनुराग सोलंकीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय, ''धन्यवाद काम्या. गेम शोसाठी लोक इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात हे पाहून धक्का बसला आहे. मला आता काही सांगायचे नाही, मला फक्त नेहाला एक विनंती करायची आहे की तू जेव्हाही बाहेर येशील तेव्हा मला आणि संपूर्ण जगाला, मी तुझ्यावर एकदाही अत्याचार केल्याचा एक पुरावा दाखव. तुझा दुसरा नवरा."

स्नेहा वाघचे पहिले लग्न 2007 मध्ये अविष्कर दारव्हेकरसोबत झाले होते, परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर स्नेहाने 2015 मध्ये अनुराग सोलंकीशी लग्न केले. मात्र, एका वर्षानंतर म्हणजे 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले.

हेही वाचा - 'सेक्स अँड द सिटी' स्टार विली गार्सन यांचे 57 व्या वर्षी निधन

ABOUT THE AUTHOR

...view details