मुंबई - अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असलेला 'स्माईल प्लिज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जूनमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर अलीकडेच ३२ कलाकारांचा समावेश असलेले 'स्माईल प्लिज'चे अँथम साँगही प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता या चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे सुनीधी चौहानने हे मराठी गाणे गायले आहे.
नात्यातील गुंफण उलगडणारे सुनिधी चौहानच्या आवाजातील 'स्माईल प्लिज'चे 'अनोळखी' गाणे प्रदर्शित - vikram fadnis
'अनोळखी' असे या गाण्याचे बोल आहेत. नात्यातील हळुवार गुंफण अगदी अलगदपणे मांडणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर, सुनिधीच्या आवाजाने हे गाणे मधुर बनवले आहे.
नात्यातील गुंफण उलगडणारे सुनिधी चौहानच्या आवाजातील 'स्माईल प्लिज'चे 'अनोळखी' गाणे प्रदर्शित
'अनोळखी' असे या गाण्याचे बोल आहेत. नात्यातील हळुवार गुंफण अगदी अलगदपणे मांडणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर, सुनिधीच्या आवाजाने हे गाणे मधुर बनवले आहे.
विक्रम फडणीस दिग्दर्शित 'Smile Please' हा चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर व्यतिरिक्त प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर, वेदश्री महाजन हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसून येतील.