महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सिंगिंग स्टार'ची विजेती स्वानंदी टिकेकर करणार 'इंडियन आयडल मराठी'चं सूत्रसंचालन! - 'इंडियन आयडल मराठी' सोनी मराठीवर

२२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'इंडियन आयडल मराठी' ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे.

स्वानंदी टिकेकर
स्वानंदी टिकेकर

By

Published : Nov 5, 2021, 3:21 PM IST

‘दिल दोस्ती दुनियादारी’ म्हणत तमाम मराठी प्रेक्षकांची लाडकी झालेली स्वानंदी टिकेकर नाटकं आणि मालिकांमधून झळकली. ‘असं माहेर नको गं बाई’ मधून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलेसे केले. तिचा ‘दिदोदु’ मधील सहकलाकार पुष्कराज चिरपुटकर सोबत ‘अमानगंबा’ मधून स्वानंदी ने प्रेक्षकांना खूप हसविले. आता स्वानंदी टिकेकर एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. ती पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

२२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'इंडियन आयडल मराठी' ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे. अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. अजय-अतुल हे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. इंडियन आयडॉल हा सांगीतिक रियालिटी शो पहिल्यांदाच मराठीमध्ये येत असून त्याबद्दल प्रेक्षकांमध्येच बरीच उत्सुकता आहे. 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सूरांची पर्वणी असणार आहे.

अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला ‘इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - टीव्ही मालिकांमध्ये पाहायला मिळणार दिवाळीचा जल्लोष!

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details