महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नागपुरात घरच्या प्रेक्षकांना ईशानने 'लक बूम बूम'वर नाचवले - अली असगर

गायक ईशान खान नागपूर शहर पोलीस वेलफेर शो करीता जोरदार परफॉर्मन्स देत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या आगमी सिंगल 'लक बूम बूम' गाणेही गायले ज्याचे खूप कौतुक करण्यात आले, हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गायक ईशान खान

By

Published : Aug 17, 2019, 3:19 PM IST

नवोदित गायक ईशान खान या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपले पहिले सॉन्ग लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ईशान हा मूळचा नागपूरचा रहिवासी असून इशानने जवळपास ८ महिन्यांनंतर आपल्या शहरातील लोकांसाठी आपले गाणे सदर केले. त्याच्या आगमी सिंगल 'लक बूम बूम' गाणेही गायले ज्याचे खूप कौतुक करण्यात आले, हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागपूर शहर पोलीस वेलफेर शो करीता नागपूर मधील मनकापूर इनडोर स्टेडियम पूर्णपणे हाऊसफुल झाले होते. स्टार्सला ऐकण्यासाठी मित्रपरिवार, आजी-आजोबांपासून लहान मुलांपर्यंत सर्व संगीत रसिकांनी आणि चाहत्यांची एकच गर्दी केली होती.

या शो मध्ये परफॉर्म करने ईशान साठी एक अभिमानास्पद क्षण होता. कारण या शोमध्ये नेहा कक्कड़, उर्वशी रौतेला, वरुण शर्मा, अली असगर, दिव्यंका त्रिपाठी आणि नताशा सूरी या लोकप्रिय कलाकारांनी देखील आपले परफॉर्मंस सादर केले. आपल्या बँड सदस्यांसह ईशानने हे निश्चित केले की प्रत्येक उपस्थित लोकांनी खुप मजा मस्ती अनुभवता यावी म्हणून त्याने बॉलिवूडमधील काही लोकप्रिय गाणी सादर करुण प्रेक्षकांसाठी ते अविस्मरणीय क्षण बनवले . आपल्या कामगिरीदरम्यान ईशानने नागपूरकरांच्या प्रेम व समर्थनाबद्दल आभार मानले.

हा कार्यक्रम पोलिस विभागात कार्यरत सर्व पोलिस तसेच शहीद पोलिसांनाआणि आपले कर्त्तव्य बजावताना जख्मी झालेले अथवा अपंगत्व आलेल्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी आयोजित करण्यात आला होता. या शोच्या माध्यमातून त्यांना मदत आणि सहकार्य करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details