मुंबई - कोरोना संक्रमणामुळे लोकांना घरी बसावे लागले आहे आणि सगळीकडे निगेटिव्हिटी पसरत चालली आहे. अशावेळी असे काहीतरी पाहिजे असते जे त्यातून बाहेर येण्यास मदत करेल. सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम या स्थितीत रामबाण उपाय ठरत आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, अशी या कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे.
संगीतकार अनु मलिकने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'आग लगा दी'! - महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडी शो बातमी
लॉकडाऊनमध्ये लोकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, अशी या कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे.
प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे. संगीत कलाविश्वात मोठे नाव असलेले गायक-गीतकार अनु मलिक ३ आणि ४ मे रोजी सोनी मराठीवरील हास्यजत्रेमध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. या वेळी अनु मलिक यांनी सेटवर धमाल केली आणि प्रसाद ओक याच्याबरोबर 'आम्ही डोलकर, डोलकर..' हे मराठी गाणंही गायलं. 'आग लगा दी' असे म्हणून स्पर्धकांचे कौतुक करणाऱ्या अनु मलिकने हास्यजत्रेच्या स्पर्धकांचे मराठीमध्ये कौतुक केले आहे. हा भाग म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका असणार आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा', हा विनोदी कार्यक्रम सोम-गुरु रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.