मुंबई - बॉलिवूडचा हँडसम हंक सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट 'थडम'चा लवकरच हिंदी रिमेक तयार करण्यात येणार आहे. मुराद खेतानी आणि भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे.
'थडम'च्या हिंदी रिमेकचं शीर्षक अद्याप ठरलं नाही. मात्र, यामध्ये सिद्धार्थ उद्योगपती तसेच, छोट्या गावातील चोर अशा दोन्ही भूमिकेत दिसणार आहे. मे महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या काही भागांमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.
हेही वाचा -सिद्धार्थ मल्होत्राने फॅन्सला दिले खास बर्थडे गिफ्ट, शेअर केले ''शेरशाह''चे पोस्टर
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार हे अद्याप जाहीर झाले नाही. मात्र, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीची वर्णी या चित्रपटात लागणार असल्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुकही लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.