महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मिर्झापूर २'मध्ये 'किलबिल' मोडमध्ये गेली श्वेता त्रिपाठी - क्वेंटिन टारन्टिनोचा क्लासिक चित्रपट 'किल बिल

'मिर्झापूर २' ही वेबसीरिज आजपासून अमेझॉन प्राइमवर स्ट्रिमिंग होत आहे. यामध्ये श्वेता त्रिपाठी अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिने किल बिल चित्रपटातील उमा थुरमनची व्यक्तीरेखा फॉलो केली असल्याचे तिने मान्य केले आहे.

Shweta Tripathi
श्वेता त्रिपाठी

By

Published : Oct 23, 2020, 3:26 PM IST

मुंबई- अभिनेत्री श्वेता त्रिपाठी शर्माने 'मिर्झापूर २' मालिकेमध्ये ती साकारत असलेल्या गोलू गुप्ता या अॅक्शन हीरॉईनच्या व्यक्तिरेखेत उमा थुरमनला चॅनलाईज्ड केले आहे. उमा थुरमनला क्वेंटिन टारन्टिनोचा क्लासिक चित्रपट 'किलबिल'मध्ये अल्फा एक्शन नायिकेच्या भूमिकेमुळे ओळखले जाते.

'किलबिल' चित्रपटातील थुरमनच्या भूमिकेमुळेच आपल्याला प्रेरणा मिळाली, असा दावा श्वेताने केला आहे. आपली बहीण स्विटी आणि बबलू पंडित यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी गोलू हिंसाचार करताना मालिकेमध्ये दिसणार आहे.

श्वेता म्हणाली, "बरेच चित्रपट संदर्भ आहेत. 'किलबिल' या यादीमध्ये नक्कीच अव्वल आहे. गोलू ही एक महिला असून ती मुख्य भूमिका साकारत आहे हे समजून घेणे महत्वाचे होते."

ती म्हणाली, "प्रतिकूल परिस्थितीशी सामना करताना तिला अत्याचार किंवा संघर्षात ढकलले जाऊ शकत नाही. वाचण्यासाठी माझ्यात तीच ऊर्जा होती, जी माझ्या आतमध्ये सामावलेली होती. गोलूमध्ये पोलादी संकल्प आहे, त्यासोबतच स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचीही गुण क्षमता आहे. माझ्यासाठी दुसरा सीझन खूपच अनोखा होता. अशी व्यक्तीरेखा साकारण्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.''

ABOUT THE AUTHOR

...view details