मुंबई- हिंदी चित्रपट आणि वेब शोमधील भूमिकांमुळे बंधने तोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी शर्मा हिची तुलना आयुष्मान खुरानाशी होत असल्यामुळे ती खूप आनंदात आहे. श्वेता म्हणाली, "आयुष्मानशी तुलना होणे आनंददायक आहे. आम्ही अशा युगात जगत आहोत जेव्हा प्रतिस्पर्धी निरोगी असेल आणि आमचे साथीदार आम्हाला अधिक चांगले करण्यासाठी प्रेरित करतील. आयुष्यमानने कलाकारांच्या या पिढीला आपल्या आवडीच्या विषयांवर काम करण्याच्या क्षमतेबद्दल अभिमान बाळगण्यास भाग पाडले आहे. असे यापूर्वी कोणत्याही अभिनेत्याकडून घडले नव्हते. मी आजपर्यंत जे काम केले त्याचे कौतुक झाले याचा आनंद वाटतो. लोकांचे मनोरंजन करताना माझा हेतू संदेश देण्याचाही आहे."
आयुष्मान खुरानाशी तुलना झाल्याने आनंदित झाली श्वेता त्रिपाठी - श्वेता त्रिपाठीची आयुष्मान खुरानाशी तुलना
अभिनेत्री श्वेता त्रिपाठीची तुलना प्रेक्षक आयुष्यमान खुरानाशी करीत आहे, याचा तिला आनंद वाटतो. विषय निवडण्याबाबत अत्यंत चोखंदळ असलेल्या श्वेताने 'लघुशंका' या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.
![आयुष्मान खुरानाशी तुलना झाल्याने आनंदित झाली श्वेता त्रिपाठी Shweta Tripathi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9256212-thumbnail-3x2-oo.jpg)
श्वेताचा नवीन शॉर्ट फिल्म 'लघुशंका' हा असाच एक चित्रपट आहे, जो जुनी प्रथा मोडणारा आहे. यात श्वेता एका अशा युवतीची भूमिका करीत आहे जिला बेडवेटिंगची (अंथरुणात लघवी करण्याची) सवय असते. यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकल्याबद्दल प्रेक्षकांनी तिच्या या कामाचे खूप कौतुक केले आहे. श्वेताचे म्हणणे आहे की, अशा अनोख्या आशयाचा भाग होण्यासाठी ती प्रयत्नशील असते.
श्वेता म्हणाली, ''प्रत्येक कलाकाराचा एक स्वतःचा प्रवास असतो. मी सुरुवातीपासूनच एका मंत्राचे पालन केलंय की, मी अशा कथाच करेन ज्या ज्या मला पटतात आणि ज्या समाज बदलासाठीच्या आहेत. जेव्हा मी लोकांचा वेळ घेते तेव्हा मला त्यांना न्याय द्यायचा असतो.''