मुंबई- अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा दुसरा पती अभिनव कोहली याला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतः श्वेता आणि तिच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अभिनवविरोधात गुन्हा नोंदवला गेला. अभिनव कोहली श्वेताच्या मुलीला २०१७ पासून अश्लील शिवीगाळ करीत होता.
श्वेता तिवारीच्या पोलीस तक्रारीनंतर पती अभिनवला अटक - आरोपी
स्वतः श्वेता आणि तिच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अभिनवविरोधात गुन्हा नोंदवला गेला. अभिनव कोहली श्वेताच्या मुलीला २०१७ पासून अश्लील शिवीगाळ करीत होता.
![श्वेता तिवारीच्या पोलीस तक्रारीनंतर पती अभिनवला अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4116049-thumbnail-3x2-shweta.jpg)
अभिनव कोहलीला अटक
याशिवाय त्याच्या मोबाईल फोनमधील मॉडेलचे अश्लील फोटोही दाखवत असे. हा सर्व प्रकार मुलीने श्वेताला सांगितला. ज्यानंतर श्वेताने तिच्या पतीला समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रकार न थांबल्याने शेवटी तिने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस उपायुक्त, प्रणय अशोक
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी अभिनव कोहली यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Last Updated : Aug 12, 2019, 7:10 PM IST