मुंबई- प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या वर्षी आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत होती.
श्वेताने तिचा नवरा अभिनव कोहलीवर घरगुती हिंसेबद्दल पोलिसात तक्ररही केली होती. याबद्दल एका मुलाखतीतही तिने स्पष्टीकरण दिले होते. परंतु आता त्यांच्या नात्यात आलबेल असल्याचे दिसते. मात्र, याबद्दल अद्यापही खात्री देता येत नाही.
एका वेबसाईटशी बोलताना अभिनव म्हणाला, ''विभक्त झालेलो नाही. आम्ही एकत्रच राहात आहोत.''
अभिनवने अलिकडेच श्वेताचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत श्वेता एका फहमान खान या चाहत्यासोबत दिसते. याशिवाय त्याने श्वेताची फहमानसोबतची एक सेल्फीही शेअर केली आहे. श्वेताचे असे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल अनेकांनी अभिनववर टीकाही केली होती.
यावर बोलताना अभिनव म्हणाला, ''मी तुम्हाला इतकेच सांगेन की, थोडा धीर धरा. भविष्यात अजूनही बऱ्याच गोष्टी समोर येतील. यातून आपल्याला पूर्णपणे स्थिती लक्षात येईल.''
अभिनवने अलिकडच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ते वेगळे झाले तेव्हा कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
कोणी काहीही बोलले तरी छापले जाते अशा शब्दात श्वेताने या गोष्टीचा साफ इन्कार केला होता. तिवारीने एका मीडिया पोर्टलला सांगितले, ''आजकाल कोणी काही बोलले तरी छापले जाते. यातून लक्षात येते की खोट्याची किती क्षमता असते.''
आपल्या नात्याबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, ''ते एक इन्फेक्शन होते ज्याचा मला खूप त्रास होत होता आणि मी ते काढून टाकले.''
श्वेताने कसोटी जिंदगी की सारखी मोठी सिरियल केली आहे. यात ती प्रमुख भूमिकेत होती. यानंतर तिने अनेक नामवंत मालिकामधून कामे केली. तिने बिग बॉसचे विजेतेपदही मिळवले होते. तिच्या खासगी आयुष्याचा विचार केला तर तिचा विवाह राजा चौधरी या भोजपूरी कलाकारासोबत झाला होता. मात्र काही काळातच हा विवाह मोडला आणि तिने अभिनव कोहलीसोबत दुसरा विवाह केला होता.