भोपाळ - टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची ( Shweta Tiwari controversy ) पत्रकार परिषदेत बोलताना जीभ घसरली आहे. नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारी श्वेता यावेळी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा ( Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra ) यांनी श्वेतावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
देवाचा अपमान सहन करणार नाही : नरोत्तम मिश्रा
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, श्वेता तिवारीचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह ( Shweta statement is offensive ) आहे. देवाचा अपमान कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही. त्यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त मकरंद देउस्कर ( Commissioner of Police Makrand Deuskar ) यांना वस्तुस्थिती आणि संदर्भ तपासण्याचे आणि २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याच्या आधारे पुढे निर्णय घेतला जाईल.
भोपाळ पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर भोपाळ पोलीस श्वेता तिवारीवर गुन्हा दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे मध्यप्रदेशात समोर आली आहेत. त्यानंतर राज्य सरकारने कारवाई केली होती.